इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत बुद्धिमत्ता (Intelligence Test) या घटकात Classification (वर्गीकरण) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वर्गीकरण म्हणजे समान गुणधर्म असलेल्या वस्तू, संख्या, शब्द किंवा आकृत्या एका गटात ठेवणे आणि वेगळ्या गुणधर्माची वस्तू ओळखणे.
1) वर्गीकरण(Classification) म्हणजे काय?
वर्गीकरण (Classification)म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी समान वैशिष्ट्य असलेले तीन पर्याय एका गटात येतात आणि एक पर्याय वेगळा असतो – तो Odd One Out ओळखायचा असतो.
उदा.
आंबा, केळी, सफरचंद, गाजर
👉 येथे गाजर वेगळे आहे (इतर सर्व फळे आहेत).
English Vocabulary-Std 4th Scholarship Exam
वर्गीकरण -1 : शब्दसंग्रह
शब्दसंग्रह वर्गीकरणाचे प्रमुख प्रकार
1️⃣ प्राणी – पक्षी – वनस्पती
उदा.
सिंह, वाघ, हत्ती, कमळ
👉 कमळ वेगळे (इतर सर्व प्राणी)
2️⃣ फळे – भाजीपाला
उदा.
आंबा, केळी, सफरचंद, गाजर
👉 गाजर वेगळे (भाजी)
3️⃣ शहर – राज्य – देश
उदा.
पुणे, मुंबई, नागपूर, भारत
👉 भारत वेगळा (देश)
4️⃣ रंग – चव – गुणधर्म
उदा.
लाल, निळा, हिरवा, गोड
👉 गोड वेगळे (चव)
5️⃣ शालेय साहित्य
उदा.
पेन्सिल, वही, पुस्तक, खुर्ची
👉 खुर्ची वेगळी (फर्निचर)
सूचना:(Classification)
प्रत्येक गटातील न बसणारा शब्द ओळखा व योग्य पर्यायाचा क्रमांक गोल करा.
प्रश्न 1
(1) घोटा
(2) टाच
(3) पंजा
(4) तळवा
उत्तर: _______
प्रश्न 2
(1) पाऊस
(2) गारा
(3) वर्षा
(4) पर्जन्य
उत्तर: _______
प्रश्न 3
(1) सापशिडी
(2) कॅरम
(3) पत्ते
(4) कबड्डी
उत्तर: _______
प्रश्न 4
(1) दूरध्वनी
(2) दूरचित्रवाणी
(3) मासिक
(4) वृत्तपत्र
उत्तर: _______
प्रश्न 5
(1) आभाळ
(2) आकाश
(3) गगन
(4) अंतराळ
उत्तर: _______
प्रश्न 6
(1) जांभळा
(2) करडा
(3) हिरवा
(4) नारंगी
उत्तर: _______
प्रश्न 7
(1) भूकंप
(2) त्सुनामी
(3) पूर
(4) अपघात
उत्तर: _______
प्रश्न 8
(1) घोडे
(2) ग्रॅम
(3) लिटर
(4) फूट
उत्तर: _______
प्रश्न 9
(1) धूमकेतू
(2) लघुग्रह
(3) अंतराळयान
(4) उल्का
उत्तर: _______
प्रश्न 10
(1) वसंत
(2) वर्षा
(3) शरद
(4) हिवाळा
उत्तर: _______
प्रश्न 11
(1) भरभर
(2) पटपट
(3) धडधड
(4) पळापळ
उत्तर: _______
प्रश्न 12
(1) उंट – सांडणी
(2) बाबा – आई
(3) मोर – मोरनी
(4) वर – वधू
उत्तर: _______
Functional Grammar :इयत्ता ४थी शिष्यवृत्ती -कार्यात्मक व्याकरण
वर्गीकरण – २ : संख्या (Number)
ओळख : या उपघटकातील प्रश्नांमध्ये चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये सम – विषम, मूळसंख्या- सयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे गुणांवर आधारित साम्य दिसून येते. त्यामुळे वा तीन संख्यांचा गट बनतो.
उपयुक्त टिपा :(Classification)
(1) रोमन अंक, अपूर्णांक, त्रिकोणी व चौरस संख्या, घड्याळ, सम-विषम, मूळ-जुळ्या, मूळ-सहमूळ संख्या विद्यार्थ्यांना माहीत असाव्यात.
(2) 1 ते 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत.
(3) 1 ते 20 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवावेत.
(4) दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार / भागाकार, सम-विषम संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात.
1 ते 15 साठी सूचना : पूढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा:(Classification)
- (1) 63 ,(2) 45,(3) 81 ,(4) 37.
- (1) 51 ,(2) 63 ,(3) 89 ,(4) 27.
- (1) 82 ,(2) 53 ,(3) 64 ,(4) 37.
- (1) 125,(2) 81 ,(3) 64 ,(4) 36.
- (1) 36 ,(2) 64 ,(3) 49 ,(4) 16.
- (1) 24/6 ,(2) 52/13 ,(3) 45/9,(4) 36/9
- (1) 248 ,(2) 846 ,(3) 428 ,(4) 824.
- (1) 28,(2) 20 ,(3) 3,(4) 55.
- (1) 31-37,(2) 59-61,(3) 11-13 ,(4) 71-73.
- (1) 14:05 वा. ,(2) 19:15 वा.,(3) 5:09 वा.,(4) 23:20 वा.
- (1) 386(2) 264,(3) 275,(4) 495.
- (1) 9/30,(2) 14/45,(3) 20/64,(4) 4/15
- (1) 4,(2) 17,(3) 7,(4) 12.
- (1) 17,(2) 290,(3) 730,(4) 71.
- (1) 2651,(2) 2246,(3) 5324,(4) 6215.
Basic Operations on Numbers-इयत्ता ४थी शिष्यवृत्ती -संख्यांवरील क्रिया
वर्गीकरण – 3 आकृत्या (Classification – 3 Figures)
या उपघटकातील प्रश्नांमध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात. यांतील तीन आकृत्यांमध्ये आढळते. हे साम्य ओळखून विद्यार्थ्यांनी त्या आकृत्यांचा एक गट बनवावा आणि एक आकृती वेगळी को
उपयुक्त टिपा: तीन आकृत्यांमधील साम्य शोधताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात:
(1) आकृत्यांची रचना / आकार.
(2) आकृत्यांचा आतील भाग.
(3) आकृत्यांमधील रेषा/बिंदू/चिन्हे यांची संख्या, स्थान व दिशा.
(4) आकृत्यांचे आरशातील / पाण्यातील प्रतिबिंब.
(5) आकृत्या घटिवत/प्रतिघटिवत फिरवून दिसणारी स्थिती.

मराठी पाठ्यपुस्तक – शब्दसंपदा विभाग PDF — मराठी शब्दसरणी आणि व्याकरण संबंधी PDF.
निष्कर्ष
शब्दसंग्रह, संख्या आणि आकृत्या हे भाषा व गणित शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
- शब्दसंग्रह वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध होते, विचार स्पष्टपणे मांडता येतात आणि वाचन-लेखन कौशल्य सुधारते.
- संख्या समजल्यामुळे वस्तूंची मोजणी, तुलना आणि योग्य वाक्यरचना करता येते.
- आकृत्या विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि गणिती समज वाढवतात.
या तिन्ही घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होतो. त्यामुळे नियमित सराव, उदाहरणांचा अभ्यास आणि कृतीआधारित शिक्षण यांना विशेष महत्त्व आहे.
शब्द, संख्या आणि आकृत्या यांचे योग्य ज्ञान म्हणजे सर्वांगीण शिक्षणाची भक्कम पायाभरणी होय.
Read more:Classification
| Select Language GK – इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती -भाषिक सामान्यज्ञान | Language GK – इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती -भाषिक सामान्यज्ञान |
|---|
Letters of Alphabets(English) – MSCE 4th Scholarship-अक्षरांची ओळख आणि शब्द निर्मिती
MSCE(Understanding)-इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती :बुद्धिमत्ता – आकलन