Hirkani -छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं स्वप्नावह सुंदर आणि म्हणून तर आज आपण मोकळा श्वास घेतोय आणि अभिमानाने या महाराष्ट्रामध्ये राहतोय तर मित्रांनो स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड स्वराज्याचा प्राण म्हणजे रायगड आण अशा प्राणप्रिय रायगडावरती हिरकणी नावाचा एक बुरुज आहे आण हा बुरुज हिरकणीच्या च्या पराक्रमाची गाथा आजही आपल्याला सांगतोय तर मित्रांनो ही घटना जी घडली हिरकणीच्या पराक्रमाची गाथा हिरकणी गडावरून कशी उतरली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा आण आज त्याच निमित्त आपण हिरकणीची सुंदर अशी गोष्ट हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आज आपण वाचणार आहोत .
हिरकणीची कथा आणि तिचा इतिहास
श्री शक्तीची ताकद किती असते एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते या कथेमधून आज आपण ऐकणार आहोत आणि सुंदर अशी Hirkani च्या पराक्रमाची गाथा ,कथा आवडली जर असेल ना एक लाईक नक्की करा आण हर हर महादेव असे आम्हाला कमेंट जरूर करा .
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009

रायगड – स्वराज्याची प्राणस्थळ
Hirkani -तर मित्रांनो स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडाच्या पायथ्याशी अनेक गाव होती. आणि रायगडाच्या पायथ्यावरच्या एका गावामधून लोक रायगडावरती अनेक वस्तू विकण्यासाठी येत होती म्हणजे आपल्या पोटा पाण्यासाठी बाजार भरायचा आणि त्याचप्रमाणे गावातून गवळणी दूध विकण्यासाठी सुद्धा रायगडावरती येत होत्या अशाच एका गावातील हिरकणी नावाची गवळण आपलं दूध दूध घेऊन ती गडावरती विकण्यासाठी येत.
कोजागिरी पौर्णिमा उत्सव माहिती – Times of India Marathi
हिरकणीचा दररोजचा संघर्ष – दूध विकण्यासाठी गडावर जाणं
Hirkani– आता हिरकणीला एक लहान तानं बाळ होतं की ते बाळ फक्त आईचच दूध पीत होतं आणि तरी सुद्धा हिरकणी आपल्या केवळ पोटा -पाण्यासाठी रायगडावरती लवकर यायची दूध घेऊन दूध विकायची आणि लगबगीन ती आपल्या बाळासाठी गडावरून उतरून निघून यायची असं तीच दररोजच चाललेल होत.हिरकणी कारण दुधापासून मिळणारे जे पैसे आहेत त्याच्यातून हिरकणीच घर चालत होतं पोट पाणी चालत होतं म्हणून तिला पर्याय नव्हता दररोज गडावरती यायचं दूध विकायचं आण ,बाळाच्या ओढीने लवकर निघून जायचं दिवसामागून दिवस चालले होते.
कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आणि गडाची सजावट
Hirkani-एके दिवशी हिरकणी भरपूर दूध घेऊन गडावरती विकाय निघाली आण तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा हिरकणीने दिवसभर दूध विकलं होतं .दिवसभर दूध विकल्यानंतर या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गडाला सजावट चालली होती. अनेक मंदिर त्या ठिकाणी रायगडावरती होती .ती मंदिर फुलांनी सजवण चालू होत . तो मोह त्या ठिकाणी हिरकणीला आवरला नाही त्या गडावरची पाहणी करण्यासाठी म्हणजे सगळे हे पाहण्यासाठी दृश्य हिरकणी गडावरती फिरू लागली. अनेक मंदिरात त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ लागली असं करता करता अंधार पडू लागला आणि नंतर हिरकणीच्या ध्यानात आलं की माझं बाळ घरी आहे .आणि तिने धाव ठोकली गडावरून मुख्य दरवाजाच्या कडे ,घरी जाण्यासाठी. Hirkani परंतु दुर्दैव त्या ठिकाणी की रात्र झाली होती आणि छत्रपतींचा आदेश होता की सकाळी दरवाजे कधी उघडायचे आण रात्र झाले की दरवाजे कधी बंद करायचे .
म्हणजे रात्र झाली की दरवाजे बंद करायचे राजा आला तरी दरवाजा उघडायचा नाही असा आदेश राजांचा त्या ठिकाणी मावळ्यांना होता . शिपायांला गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला .हिरकणी त्या ठिकाणी शिपायांना गयावया करत होती. ‘ अहो माझं बाळ घरी तान बाळ आहे ती आई शिवाय कुठलं बाहेरच दूध पीत नाही ,माझं बाळ रडत असेल मला सोडा मी पटकन जाते, मग घडाचा दरवाजा बंद करा.’ Hirkani गडाचे शिपाई त्या ठिकाणी हिरकणला सांगत होते कि ,अहो राजाचा आदेश आहे आमच्या की राज स्वतः आल संध्याकाळच तरी दरवाजा उघडायचा नाही . आम्ही आता दरवाजा उघडू शकत नाही हिरकणीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या काय करावं ते कळे ना तिच्या डोळ्यासमोर चित्र होतं की आपलं बाळ रडत होतं टाहू फोडत होतं बुकेन व्याकुळ झालेलं बाळ तिच्या डोळ्यासमोर येई ,काय कराव हेच तिला कळेना तिने निश्चय केला की आता काही झालं तरी चालेल परंतु मला गडावरून घरी गेलच पाहिजे .Hirkani कारण माझं बाळ रडत असल आणि या गडावरून उतरण्यासाठी हिरकणी गडाच्या चोह बाजूने फिरू लागली रस्ता शोधू लागली की कुठून मला उतरता येईल चारही बाजूने ताशीवकडे होते उतराव कसं ! हे कळेना वाऱ्यालाही भय वाटावं ,पावसाच्या पाण्यालाही भय वाटाव असं ताशीवकडे हिरकणीने एक जागा हेरली .
एक टोक होतं त्या टोकावरून निश्चय केला हिरकणीन की गडावरून खाली उतरून जायचं पदर खोसला आणि हिरकणी गडावरून खाली उतरू लागली उतरताना अनेक काटे हिरकणीच्या हाताला टोचत होते रक्त भंभाळ झालती हिरकणीला वाटत होत तो काळ किती शेकडो वर्षाचा , पायात चपल्या नव्हत्या पायात कितेक काट मोडत होती तरी सुद्धा हिरकणीचा प्रयत्न हा चालू होता .हिरकणी गड उतरत होती हात निसटला पाय घसरला तर मृत्यू हा निश्चित. पण तरी सुद्धा हिरकणीच्या डोळ्यासमोर चित्र होतं रडणाऱ्या बाळाचं .तिने निश्चय केलता की आता उतरायचंच या सगळ्या संकटाचा सामना करत हिरकणी खाली उतरत होती . अनेक हिंस्र पशू वाघ लांडगे यांची भीती आणि तरी सुद्धा सगळ्या संकटाचा सामना करत हिरकणी रायगडावरून खाली उतरली . उतरल्याबरोबर धाव ठोकली आपल्या घराकडे .
हिरकणीच्या संघर्षाची महती आणि आईचे प्रेम
घराकडे गेली आणि आपल्या बाळाला छातीशी कवटाळलं आणि प्रेमानं आपल्या बाळाला दूध पाजलं . Hirkani विचार करा एवढा मोठा रायगड की जे दिवसाही उतरणं शक्य नाही म्हणजे या कड्यावरून हिरकणी रात्रीच्या अंधारात उतरली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा आणि त्या ठिकाणी साथ मिळाली लक्ष्मी मातेची लक्षात घ्या या व्रताच्या दिवशी केलेला निश्चय हा खराच होतो. त्या ठिकाणी हिरकणीला सुद्धा साथ मिळाली बघा , लक्ष्मी मातेची दिवस उगवला हिरकणी गडावरती नाही हिरकणी गड उतरून गेली कशी गेली ही बातमी रायगडावरती चोही बाजूला पसरली . सगळ्यांना आश्चर्य वाटू लागले , हिरकणी गेली कशी काहीने सांगितलं की हिरकणी त्या टोकावरून उतरून खाली गेली आणि ही बातमी छत्रपतींच्या पर्यंत जाऊन पोहोचली राजांना फार कौतुक वाटलं हिरकणीच्या पराक्रमाची गाथा ऐकूनही राजांनी तात्काळ आदेश सोडला आपल्या मावळ्यांना ,की हिरकणीला गडावरती घेऊन या सन्मानान आणि मावळे त्या ठिकाणी हिरकणीला घेऊन गडावरती आले .सन्मानाने राजांनी साडी- चोळी देऊन त्या ठिकाणी हिरकणीचा सत्कार केला, बक्षीस दिलं.
परंतु त्या ठिकाणी राजांच्या मनामध्ये पाल चुकचुकली की रायगडाची सुरक्षा धोक्यात आहे .शत्रू या ठिकाणी वर येईल परत आणि छत्रपती शिवरायांनी तात्काळ आदेश दिला आपल्या मावळ्यांना की ज्या ठिकाणाहून हिरकणी उतरली तो कडा तासून काढला ,त्या ठिकाणावरून परत कुणीही परत येऊ नये त्या ठिकाणी बुरुंज बांधला आणि हिरकणीच्या पराक्रमाची गाथा म्हणून त्या बुरुजाला नाव Hirkani बुरुज दिलं .
हिरकणीची ही कथा केवळ एका स्त्रीच्या धाडसाची नाही, तर आईच्या मायेची आणि निश्चयाची प्रतीक आहे.तिने दाखवून दिलं की प्रेम आणि जबाबदारी यांच्या ताकदीसमोर कोणतंही संकट मोठं नसतं.
रायगडाच्या उंच ताशीव कड्यावरून उतरलेली ती एक आई आजही मराठी मातीचा अभिमान आहे.
हिरकणीच्या पावलांचे ठसे त्या गडावर आजही प्रेरणा देतात.Hirkani तिच्या कथेतून प्रत्येकाला शिकायला मिळतं की आई म्हणजेच खरी शक्ती.कोजागिरी पौर्णिमेच्या त्या चांदण्याखाली उमटलेली ही गाथा आजही इतिहासाचा उजळ ठसा आहे.हिरकणीने केवळ आपल्या बाळासाठी नव्हे, तर मातृत्वाचा सन्मान वाढवला.छत्रपती शिवरायांनी दिलेलं “हिरकणी बुरुज” हे नाव तिच्या अमर धाडसाचं स्मारक बनलं.
शतके उलटली, पण हिरकणीचं नाव आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे.
ही कथा आपल्याला सांगते — “आईच्या प्रेमापेक्षा मोठं धाडस जगात नाही!”
निष्कर्ष
Hirkani-मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ गेला आजही त्या ठिकाणी हिरकणी बुरुंज म्हटलं जातं एका स्त्रीशक्तीची ताकद आज महाराष्ट्राच्या मराठी मनामनामध्ये हृदया हृदयामध्ये हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आजही राहते बघा डोळ्यासमोर हिरकणीच चित्र उभं राहत . मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक घ्यायचे की एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते, तर मित्रांनो ही जी घटना घडली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा त्याच निमित्त सुंदर अशी हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आपण नक्की वाचा आणि ही गोष्ट आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा