MAHA TET Syllabus in Marathi –MAHA TET 2025 चा संपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus) मराठीत. विषयनिहाय Study Plan, उत्तम पुस्तके, तयारी टिप्स आणि मागील प्रश्नपत्रिका. पहिल्याच प्रयत्नात TET परीक्षा Crack करा.
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आपलं मनःपूर्वक स्वागत आहे या ब्लॉगमध्ये. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही स्पर्धा परीक्षा शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
- MAHA TET Syllabus in Marathi
- MAHA TET Study Plan (अभ्यास योजना)
- परीक्षा Crack करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
MAHA TET परीक्षा काय आहे?-MAHA TET Syllabus in Marathi
MAHA TET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही महाराष्ट्रातील प्राथमिक (Paper 1: इयत्ता 1-5) व माध्यमिक (Paper 2: इयत्ता 6-8) शाळेत शिक्षक होण्यासाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्याशिवाय सरकारी व खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळत नाही.
MAHA TET Syllabus (मराठीमध्ये अभ्यासक्रम)-MAHA TET Syllabus in Marathi
1. मराठी विषय (30 गुण)
- व्याकरण : शब्दांच्या जाती, वर्णमाला, संधी, विग्रह, प्रयोग, समास
- वाक्यरचना : वाक्यांचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्हे
- शब्दसंग्रह : समानार्थी- विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार
- इतर : उतारावाचन, कविता निरीक्षण, पत्रलेखन
- शिफारस केलेली पुस्तके : मोरा वाळंबे व बाळासाहेब शिंदे
2. गणित व बुद्धिमत्ता (30 गुण)
- संख्या प्रणाली, ल.स.वी.-म.स.वी., शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण
- वेळ, काम, वेग- अंतर, रेल्वे उदाहरणे
- भूमिती : त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, आयत, वृत्तचित्र
- बुद्धिमत्ता : संख्या श्रेणी, आकृती, आरसा प्रतिमा, घड्याळ, कालमापन, नातेसंबंध
- तयारीसाठी : विद्याभारती प्रकाशन प्रश्नसंच उपयुक्त.
3. बालमानसशास्त्र (30 गुण)
- अध्ययन प्रक्रिया व स्वरूप
- अध्यापन प्रक्रिया व शिक्षकाची भूमिका
- बालकाचा विकास, टप्पे व बुद्ध्यांक मापन
- अध्ययनावर परिणाम करणारे घटक
- NEP 2020 (राष्ट्रीय शिक्षण धोरण) – २-३ प्रश्न हमखास
- अभ्यासासाठी : ११वी-१२वीचे शिक्षणशास्त्र पुस्तक
4. इंग्रजी (30 गुण)
- Grammar : Articles, Prepositions, Question Tag, Direct-Indirect, Tense
- Vocabulary : Synonyms, Antonyms, One Word Substitution, Punctuation
- Figure of Speech, Spelling, Error Detection.
5. परिसर अभ्यास (Environmental Studies / Social Science) (30 गुण)
- विज्ञान : ५-७ प्रश्न
- इतिहास : ३-४ प्रश्न
- भूगोल : ६-७ प्रश्न
- नागरी प्रशासन : २-३ प्रश्न
- संगणक : १-२ प्रश्न
- माहितीचा अधिकार व पर्यावरण : नियमित प्रश्न
- चालू घडामोडी : ५-६ प्रश्न
- हा संपूर्ण सिलॅबस इयत्ता 1 ते 10 च्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतो.
अधिकृत माहितीसाठी येथे click करा .
आणखी माहितीसाठी येथे click करा .
MAHA TET Study Plan (अभ्यास योजना)-MAHA TET Syllabus in Marathi
रोजचा अभ्यास तक्ता
- २ तास मराठी (Grammar + शब्दसंग्रह सराव)
- २ तास गणित/बुद्धिमत्ता (MCQ सराव)
- २ तास बालमानसशास्त्र (नोट्स व संकल्पना)
- १ तास इंग्रजी (Grammar + Vocabulary)
- १ तास परिसर अभ्यास (पाठ्यपुस्तक वाचन)
- आठवड्याचा सराव
- दर आठवड्याला किमान २ Mock Test
- मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा
- कमजोर विषयांवर अधिक वेळ द्या.
TET परीक्षा Crack करण्यासाठी टिप्स-MAHA TET Syllabus in Marathi
- संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करा
- MCQ प्रॅक्टिस नियमित करा
- स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करा
- वेळ व्यवस्थापन शिकून घ्या
- चालू घडामोडींचे अपडेट ठेवा
- NEP 2020 नीट वाचा (अत्यंत महत्त्वाचे)
अतिरिक्त टिप्स – MAHA TET तयारीसाठी-MAHA TET Syllabus in Marathi
- MAHA TET ही परीक्षा फक्त अभ्यासक्रम वाचून पास होत नाही, तर त्यासाठी नियोजनबद्ध तयारी, सराव व वेळेचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. सर्वात पहिले पाऊल म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे. अनेक विद्यार्थी थेट प्रश्नसंच सोडवायला लागतात, पण आधी बेसिक संकल्पना नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे.
- दररोज ठराविक वेळ ठेऊन अभ्यास करा. एकाच विषयावर जास्त वेळ न घालवता प्रत्येक विषयाला समान प्राधान्य द्या. उदाहरणार्थ, गणितात जास्त वेळ लागतो तर इंग्रजी व मराठी सोप्या पद्धतीने सराव करून पूर्ण करता येतात.
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हा यशस्वी होण्यासाठीचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे प्रश्न विचारण्याची पद्धत, वेळेचे व्यवस्थापन आणि स्वतःच्या कमजोरी शोधता येतात.
- तयारीदरम्यान स्वतःच्या नोट्स तयार करा. पुस्तकातून थेट वाचण्यापेक्षा छोट्या नोट्स परीक्षा काळात खूप उपयुक्त ठरतात. विशेषतः बालमानसशास्त्र आणि NEP 2020 या विषयांसाठी छोटे-छोटे पॉईंट्स लिहून ठेवा.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमितता (Consistency). रोज थोडासा अभ्यास केला तरी त्याचा परिणाम जास्त होतो, एकदम मोठा अभ्यास करून थांबल्यास विसरण्याची शक्यता जास्त असते.
- लक्षात ठेवा – MAHA TET परीक्षा ही स्पर्धा आहे, पण योग्य दिशा आणि योग्य साधने वापरून कोणत्याही विद्यार्थ्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते.
FAQ – MAHA TET बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न-MAHA TET Syllabus in Marathi
Q1. MAHA TET साठी कोणते बुक बेस्ट आहे?
उत्तर – मराठी साठी मोरा वाळंबे / बाळासाहेब शिंदे, गणितासाठी विद्याभारती प्रश्नसंच, बालमानसशास्त्रासाठी ११वी-१२वी शिक्षणशास्त्र.
Q2. MAHA TET मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
नाही. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवणे फायदेशीर.
Q3. NEP 2020 वरून प्रश्न विचारले जातात का?
उत्तर –होय, दरवेळी किमान २-३ प्रश्न विचारले जातात.
Q4. रोज किती तास अभ्यास करावा?
उत्तर –किमान ६-७ तास अभ्यास आवश्यक आहे.
Q5. पहिल्याच प्रयत्नात MAHA TET Crack होऊ शकतो का?
उत्तर – होय, योग्य मार्गदर्शन, नियमित सराव व Mock Test दिल्यास नक्की यश मिळते.
निष्कर्ष
MAHA TET परीक्षा कठीण नाही, पण नियमित अभ्यास, योग्य पुस्तके आणि MCQ सराव यावर यश अवलंबून आहे. मराठी व गणित हे गुण मिळवण्याचे विषय आहेत, तर बालमानसशास्त्र व NEP 2020 समजून घेतल्यास यश हमखास आहे.
लक्षात ठेवा – Consistency + Practice = Success