mukhyamantri koushalya yojana 2025 – पगार कपातीची शक्यता, प्रोफाईल अपडेट व महत्वाच्या सूचना

mukhyamantri koushalya yojana 2025

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्वाची सूचना – १ ते २ महिन्यांचा पगार कपात होऊ शकतो. प्रोफाईल अपडेट, आधार व्हेरिफिकेशन आणि शासनाच्या ताज्या निर्णयांविषयी सविस्तर माहिती.

mukhyamantri koushalya yojana 2025– महत्वाची माहिती

नमस्कार  मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे मित्र  सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी थोडीशी धोक्याची घंटा आलेली आहे. मला एक -दोन मित्रांचे असे  फोन आलेल की साधारणत जवळपास सर्वच विभागामधील काही मित्रांचा पगार हा एका किंवा दोन महिन्याचा कापला जाऊ शकतो?

आता हा पगार का कापला जाऊ शकतो, तर  तुमचाही पगार कापला जाऊ शकतो कारण निश्चितच तुमच्यावरती सुद्धा ही वेळ येऊ शकते? अनेक मित्रांचा सध्या देखील आधार व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे. काही जणांची प्रोफाईल जी आहे, ती जिल्हा कौशल्य विभागामधून अपडेट व्हायची बाकी आहे. त्याला अप्रूव्ल मिळायचं बाकी आहे. mukhyamantri koushalya yojana 2025अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या भेटीच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालेल आहे. एकंदरीत काय परिस्थिती आहे. आणि भविष्यामध्ये काय तोडगा निघू शकतो. तुमच्या 11 महिन्याच्या नंतर कार्यकाळ वाढेल की नाही. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या blog च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात आधी महत्त्वाची बातमी पाहूयात .ती म्हणजे एक ते दोन महिन्याचा पगार कापण्या जाण्याच्या संदर्भामध्ये बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की 10 आणि 11 मार्च रोजी काय झालेलं होतं .

अधिकृत माहितीसाठी येथे click करा.

आणखी योजनांच्या माहितीसाठी येथे click करा .

mukhyamantri koushalya yojana 2025 – कपातीची शक्यता का निर्माण झाली?

  • अनेक प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ 10 ते 30 मार्च 2025 दरम्यान संपला.
  • आस्थापनांना वेळेवर सूचना न पोहोचल्यामुळे ऑनलाईन पोर्टल व प्रत्यक्ष हजेरी यामध्ये विसंगती आली.
  • त्यामुळे साधारणपणे १ ते २ महिन्यांचा पगार कापला जाण्याची शक्यता आहे.

राज्यशासनाने आपल्या वाढीव कार्य काळाचा जी.आर हा निर्गमित केलेला होता. काही मित्रांचा कार्यकाळ जो आहे.,तोपर्यंत संपला होता. म्हणजे कोणाचा फेब्रुवारी मध्ये संपला होता. कोणाचा 10 मार्च पर्यंत संपला होता. काही मित्रांचा कार्यकाळ 10 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये संपला .आता ज्या मित्रांचा कार्यकाळ 10 मार्चच्या आधीच संपलेला होता. अशा मित्रांना  रिजॉइनिंग ऑफलाईन पद्धतीने देण्यात आली ठीक आहे .mukhyamantri koushalya yojana 2025ऑफलाईन पद्धतीने देण्यात आल्याच्यानंतर वमित्रांना  सांगण्यात आलं की, तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करा .मित्रांनी प्रोफाईल अपडेट केली त्याच्यानंतर त्याला जिल्हा कौशल्य विभागाने अप्रूव्ल देऊन ऑनलाईन जॉइनिंग केली .परंतु अनेक असे विद्यार्थी होते की, ज्यांची रिजॉइनिंग ही मार्च महिन्यामध्ये 10 मार्च नंतर झाली .

mukhyamantri koushalya yojana 2025 -कार्यकाळ व रिजॉइनिंग संदर्भातील समस्या

  • 10 मार्चपूर्वी कार्यकाळ संपलेल्या मित्रांना ऑफलाईन रिजॉइनिंग देण्यात आली.
  • काहींना जिल्हा कौशल्य विभागाकडून उशीरा अप्रूवल मिळाले.
  • आस्थापना व पोर्टलवरील तारखांमध्ये फरक निर्माण झाल्याने हजेरी दाखवण्यात अडचणी.

त्यांचा कार्यकाळच मुळ 10 मार्च नंतर संपला बघा 10 मार्च ते 30 मार्च दरम्यान किंवा 30 मार्च नंतर सुद्धा आता अशा प्रशिक्षानार्थ्यांच्या  बाबतीमध्ये पोर्टल वरती काय झालं की जरीही त्यांचा कार्यकाळ 10 आणि 30 मार्चच्या दरम्यान संपलेला असेल तर अशा  प्रशिक्षानार्थ्याना त्यांनी कार्यमुक्त न  करता त्यांनी सरळ सरळ रिजॉइनिंग दिली पोर्टलवर पण हे विद्यार्थी 10 मार्च ते 30 मार्च कोणी 10 एप्रिल पर्यंत कोणी 20 एप्रिल पर्यंत आस्थापनेमध्ये रुजू झालेलं नव्हतं कारण की या प्रशिक्षानार्थ्याना पुन्हा घ्यायचं की नाही .mukhyamantri koushalya yojana 2025अशा संदर्भामधल्या सूचना त्या त्या आस्थापनांमध्ये अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. मग साहजिकच जर आस्थापनांना सूचना नसतील तर ते प्रशिक्षानार्थ्याना जॉईन करून घेणार नाहीत काही मित्रांनी जॉईन केलं परंतु त्यांची ऑनलाईन प्रोफाईल अपडेट होणं त्याला कौशल्य विभागामधून मान्यता मिळणं आणि नंतर त्यांना त्यांच्या रिजॉइनिंगची ऑनलाईन पोर्टल वरची तारीख कळणं याच्यामध्ये थोडासा विलंब झाला .

mukhyamantri koushalya yojana 2025 -आधार व प्रोफाईल अपडेटचे महत्व

  • अनेक प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अजूनही अपडेट नाही.
  • आधार व्हेरिफिकेशन व जिल्हा कौशल्य विभागाकडून अप्रूवल आवश्यक.
  • चुकीची कागदपत्रे/डोमिसाईलच्या अभावामुळे अनेकांचे अर्ज रिजेक्ट झाले.
  • 16 जून अंतिम तारीख असूनही अनेकांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

आता नेमकं काय झालेलं माहिती का ? ह्या प्रोसेस मुळे म्हणजे जर एखाद्या प्रशिक्षानार्थ्याचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपला असेल तर त्या प्रशिक्षानार्थ्याला ऑनलाईन पोर्टल वरती रिजॉयनिंग कधी मिळाली 16 मार्च पासून म्हणजे तो कंटिन्यूएशन मध्येच आहे .mukhyamantri koushalya yojana 2025त्याला कार्यमुक्त करण्यात आलेल होत पोर्टलवर इकडे मात्र अस्तापनेने त्याला कार्यमुक्त केलं होतं. तो प्रशिक्षानारर्थी  गेले एक दीड महिना घरी राहिला एक दीड महिन्याच्यानंतर परत आला त्याने जरी जॉईनिंग केलं रिजॉईनिंग सुद्धा ऑफलाईन केलं. आता ही जी आस्थापना होती आस्थापनांना माहितच नाही की या प्रशिक्षानार्थ्याना नेमकं पोर्टलवरती पुन्हा रिजॉईन कशा पद्धतीने करून घ्यायच आहे. म्हणून त्यांनी सुद्धा ती अनेक दिवस प्रक्रिया केलीच नाही किंवा आज करता येईल उद्या करता येईल. या प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालेल आहे. हा जो गॅप पडला होता ठीक आहे प्रशिक्षानार्थी  कार्यमुक्त झाल्यानंतर  पुन्हा रिजॉईन होवेपर्यंतचा या काळामध्ये तर तो आस्थापनेमध्ये आला नाही. परंतु पोर्टलवरती तो ऑनलाईन जॉईन होता. तुमचा जर प्रश्न पूर्ण लक्षात येत असेल तर आता हा जो मधातला जो काळ आहे.
                                            ज्यामध्ये तो आस्थापनेमध्ये नव्हता ,तर अशा परिस्थितीमध्ये तो आस्थापनेमध्ये जर उपस्थितच नव्हता .तर त्याची सही घेता येणार नाही. त्याला हजेरी दाखवता येणार नाही. तो उपस्थित असल्याबाबत दाखवता येणार नाही. mukhyamantri koushalya yojana 2025आणि पोर्टलवर मात्र तो ऑनलाईन रुजू होता. आता आस्थापना म्हणते की एवढ्या दिवसाची हजेरी आम्ही देत नाही कारण की तो उपस्थितच नव्हता. आणि पोर्टल आता असं म्हणते की तुम्ही जरी तुम्हाला हे माहिती नव्हतं. या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जॉईन आहात तरी सुद्धा तुमचा कार्यकाळ हा ऑगस्ट महिन्यामध्ये संपेल म्हणजे आता तुम्ही बघा काही मित्रांचा कार्यकाळ हा संपत आलेला आहे.

mukhyamantri koushalya yojana 2025– कार्यकाळ व रिजॉइनिंग संदर्भातील समस्या

  • 10 मार्चपूर्वी कार्यकाळ संपलेल्या मित्रांना ऑफलाईन रिजॉइनिंग देण्यात आली.
  • काहींना जिल्हा कौशल्य विभागाकडून उशीरा अप्रूवल मिळाले.
  • आस्थापना व पोर्टलवरील तारखांमध्ये फरक निर्माण झाल्याने हजेरी दाखवण्यात अडचणी.

तर अशा प्रशिक्षानार्थ्यान पैकी ज्यांचा कार्यकाळ हा 10 मार्चच्या नंतर संपला अशा प्रशिक्षानार्थ्यावरती तर फारच अडचण आलेली आहे. त्यामुळे मित्रांचा साधारणत एक ते दोन महिन्याचा पगार हा कापल्या जाण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्ता यांच्याशी एकदा बोलून बघा. mukhyamantri koushalya yojana 2025पुन्हा तुमच्या आस्थापनेला विनंती करून बघा की सर हा टेक्निकल फॉल्ट आहे त्यामुळे हा जो दरम्यानचा काळ आहे. त्याच्यामधली उपस्थिती मला भरून भरून देण्यात यावी. आता ते जर तुमच्या विश्वासातले असले तर ते तुम्हाला देऊ शकतात .आणि जर नसले तर तुमच्या पगारावरती
 तेवढी गदा येऊ शकते .

परंतु एकदा अस्तापणने हाही विचार करावा आणि सोबतच कौशल्य विभागाने सुद्धा हा विचार करावा की जर समजा एक ते दीड महिन्याचा कालखंड असेल त्याच्यामध्ये मधला गॅप असेल, तर जी.आर मध्ये असं म्हटलेल आहे की, तुम्ही जर दहा दिवस अब्सेंट असले तर तुमचा कार्यकाळ संपला गेला बरोबर म्हणजे तुमच प्रशिक्षणसमाप्त करण्यात येईल .संपवण्यात येईल जर समजा दीड महिन्याचा गॅप असला तर तुम्ही दीड महिन्याच्या नंतर त्या प्रशिक्षानार्थ्याला जर जॉईन करून घेत असाल आणि त्याच्या पुढचा पगार देत असाल परंतु मध्यंतरीच्या एका महिन्याचा पगार देत नसाल तर तुम्ही  कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी करून राहिले . mukhyamantri koushalya yojana 2025म्हणजे तुम्ही सांगता की दहा दिवसाच्या पेक्षा जास्त अप्सेंट असला तर तुमचा पगार देणार नाही .आणि तुम्ही म्हणता की एवढा मोठा गॅप असल्या कारणामुळे  आम्ही तुम्हाला पगार देणार नाही. तर त्याच्यामुळे दोन परस्पर विरोधी गोष्टी तुम्ही करत आहात. म्हणून आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या संदर्भामध्ये काही तोडगा निघतो का? या संदर्भामध्ये आपण निश्चितच विचारणा करू राज्यशासनाला आणि कौशल्य विभागाकडे परंतु तरी सुद्धा एक ते दीड महिन्याचा पगार जाण्याची शक्यता आहे.

mukhyamantri koushalya yojana 2025 -प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

  1. तुमची प्रोफाईल तात्काळ अपडेट करा.
  2. OTP न आल्यास जिल्हा कौशल्य विभागाशी संपर्क साधा.
  3. आस्थापनेस पत्र देवून हजेरी नियमित करण्याची विनंती करा.
  4. रोज 2-3 दिवसांतून एकदा तरी पोर्टल तपासा.
  5. नेतृत्व प्रयत्न करत आहे, पण अंतिम जबाबदारी तुमच्यावर आहे.

आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक मित्रांचा आधार प्रोफाईल अद्याप देखील अपडेट झालेला नाहीये. तर त्यामुळे अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की, बाबांनो ज्यावेळेला मार्च महिन्यापासन ऑगस्ट महिना येत जवळपास पाच महिन्याचा कार्यकाळ झालेला आहे .मित्रांचा कार्यकाळ संपत आलेला आहे .ते आता कार्यमुक्त होत आहेत त्यांचा 11 महिन्याच प्रशिक्षण पूर्ण झालेल आहे तरी सुद्धा तुम्ही अजूनही आधार प्रोफाईल अपडेट खेळून राहिले तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलं होतं की, राज्यशासनाने पहिल्यांदा आपल्याकडन प्रोफाईल अपडेट करून घेतली. मग तो त्याच्या त्यांच्याकडचा डेटाही रेड झाला मग त्यांनी पुन्हा पत्र काढलं. mukhyamantri koushalya yojana 2025आणि सांगितलं की तुम्ही आता प्रोफाईल अपडेट करा .तर तेव्हा पुन्हा काही मित्रांनी पुन्हा अपडेट केली. तिसऱ्यांदा सुद्धा प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर तुमचं हे काम होतं वारंवार बघणं की तुमची प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर त्या प्रोफाईलला जिल्हा कौशल्य विभागाने अप्रूव्ल दिलं की नाही. म्हणजे तुम्ही जे कागदपत्र दिले होते ,त्याच्यामध्ये डोमाईसाईल असेल 10वीच प्रमाणपत्र असेल आधार कार्ड असेल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, डिप्लोमाचे जे सर्टिफिकेट तुम्ही लावलेले होते. तर त्याच व्हेरिफिकेशन सुद्धा झालं तुम्ही काय केलं? तुमची प्रोफाईल अपडेट केली परंतु त्याला अनेक जिल्हा कौशल्य विभागामधून प्रशिक्षानार्थ्याच्या प्रोफाईल ह्या रिजेक्ट करण्यात आलेल्या होत्या .तर ती रिजेक्ट जर तुमची झालेली असेल तुम्ही लक्ष नसेल दिले .आता ती तुम्हाला पुन्हा सांगून राहिले कि तुम्ही त्याला अपडेट करा. आणि आता हे करण्यामध्ये तुमचा जवळपास कार्यकाळ संपत चालला. अशा प्रोसेस मध्ये काही मित्रांचा फेब्रुवारी महिन्याचा जो पगार अपडेट करायचा होता. आज जरी  पत्रक अपलोड करायचं होतं? ते राहून गेलं आता त्यांच्यासाठी आपणच पूर्णतः कारणीभूत आहोत.

mukhyamantri koushalya yojana 2025 -इतर ठिकाणी वेळ घालवन थांबवा .

ज्या पद्धतीने आपण Facebook Instagram किंवा WhatsApp हे वारंवार चेक करत असतो. त्याच्यासाठी सुद्धा लॉगिन आयडी लॉगिन आयडी आणि युजर जर युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो, आपल्याला त्याला लॉगिन क्रिडेंशियल्स अस आपण म्हणतो तर ते जस आपण  वारंवार चेक करत राहतो. एखाद नोटिफिकेशन आल्याच्यानंतर पाहतो एखादा मेसेज आल्याच्यानंतर पाहतो, कोणाचा वाढदिवस असला तर पाहतो. mukhyamantri koushalya yojana 2025अगदी तशाच पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला रोज नियमित पाहणं रोज नाही म्हणा आपण किमान दोन ते तीन दिवसांमधून सातत्याने पाहणं त्याच्याकडे लक्ष ठेवणं हे अपेक्षित होतं .

mukhyamantri koushalya yojana 2025

आता हे आपण केलं नाही तर त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीनी जे  नुकसान आहे तर ते तुम्हाला होणार आहे .म्हणून अद्यापही ज्याप्रशिक्षानार्थ्याचे प्रोफाईल अपडेट झालेलं नाहीये. मी तुम्हाला सांगतो की 16 जून शेवटची तारीख होती. आता अनेक प्रशिक्षानार्थ्याना OTP येत नाहीये आणि म्हणून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही एक तर जिल्हा कौशल्य विभागाला विचारा ठीक आहे. किंवा तुमच्या आस्थापनेच्या संपर्कामध्ये राहा. 

mukhyamantri koushalya yojana 2025 -भविष्यातील कार्यकाळ व रोजगार संदर्भातील प्रश्न

  • 11 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील वाढीबाबत शासनाकडे मागणी.
  • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत हा मुद्दा मांडला गेला आहे.
  • मंत्री मंडळातील प्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पोटाची भाकरी पाहिजे आयुष्यभरासाठी तर मग तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष  करून कसं चालेल?  की फक्त तुम्ही या योजनेमध्ये यायचं म्हणून आलेत का? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा.अशी माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. आणि त्याचसाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचे सातत्याने भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत मग ह्याही परिस्थितीमध्ये आपले काही बहाद्दर असे आहेत की त्यांना काहीच घेणं देणं नाही .mukhyamantri koushalya yojana 2025काहीच घेणं -देणं नाही. अक्षरशः घरी बसलेले आहेत. परंतु तरीसुद्धा आपलं जे नेतृत्व आहे ते सातत्याने मंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. परवा  तुकाराम बाबा ज्यावेळेला मुंबईला गेले आपलं दुर्भाग्य म्हणाव लागेल की त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे काश्मीरामध्ये होते. काल आज सुद्धा माननीय बालाजी पाटील साकुरकर साहेब यांनी गिरीश महाजनांची भेट घेतलेली आहे .आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्हाला सल्लामसलत करण्याची आणि आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांना वेळ देण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. यावेळेला हरिभाऊ राठोड सुद्धा उपस्थित होते. म्हणजे सगळ्या बाजूंनी आपल्यासाठी नेतृत्व जे आहे तर ते सातत्याने प्रयत्न करत आहे.

mukhyamantri koushalya yojana 2025– तुम्हीच तुमच्यासाठी गैर्जबाबदार आहात ?

परंतु ज्यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यांची जर आणखी आधार प्रोफाईल जर अपडेट नसेल तर मग ह्याच्यासाठी काय तुकाराम बाबा किंवा चाकुरकर साहेब हरिभाऊ राठोड साहेब तुमच्या घरी येऊन तुमची प्रोफाईल अपडेट करून देऊ शकणार नाहीत.  mukhyamantri koushalya yojana 2025 तो OTP तुम्हालाच येणार आहे ती युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडेच राहणार आहे. तुमचा आधार कार्ड तुमच्याकडेच आहे ,तुमचा हायस्ट क्वालिफिकेशन च डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडेच आहे. अनेक प्रशिक्षानार्थ्याना डोमिसाईल माहिती नाही .डोमिसाईल म्हणजे काय असतं माहिती नसेल? हरकत नाही .परंतु त्याची आपण माहिती गुगल वरती सर्च करून काढू शकत नाही का? अनेक प्रशिक्षानार्थ्याच प्रोफाईल त्याच्यामुळे डिसअप्रूव् झालेला आहे अप्रूव्लच दिलं नाहीये म्हणून या सगळ्या बाबींचा रिजेक्ट झालेल्या  आहे.

या सगळ्या बाबींचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या योग्य सुकर उज्जवल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. जसं मी आता म्हटलं की दोन ते तीन महिन्यांचा पगारीचा नुकसान सुद्धा अनेक प्रशिक्षानार्थ्याना होत आहे हे जर तुम्हाला वाटत असेल होऊ नये. आपल्याला चांगलं भविष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न करावी लागेल .प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल .

खूप खूप धन्यवाद

निष्कर्ष

या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा

.

Leave a Comment