ras kashi olkhavi 2025? | जन्मपत्रिकेतून रास शोधण्याची सोपी पद्धत

ras kashi olkhavi 2025?

मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि तो विषय म्हणजे रास कशी ओळखायची ?आपल्यापैकी अनेक जणांना त्यांची रास माहित नाहीये किंवा काही जण चालू नावावरून रास पकडतात किंवा अनेक जण राशी बद्दलचे अनेक गैरसमज मनात धरून बसलेले आहेत .हे सगळे गैरसमज तुमचे दूर करणार आहोत. तुमची रास कोणती आहे हे तुम्ही काढू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहोत. पण त्यासाठी blog  शेवट पर्यंत लक्ष देऊन वाचावा लागेल आणि त्याचबरोबर आजचा विषय तुम्हाला आवडला तर blog ला लगेच follow करा .

ras kashi olkhavi 2025? | जन्मपत्रिकेतून रास शोधण्याची सोपी पद्धत ?रास का महत्त्वाची आहे?

 चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे माजी  रास कोणती?  रास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे .ज्योतिष शास्त्रानुसार राशी वरूनच राशी भविष्य सांगितलं जातं अनेकांना त्यांची रास माहीत नसल्यामुळे त्यांना राशी भविष्यही बघता येत नाही .किंवा राशीनुसार अनेक उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले जातात म्हणजे जर तुमच्या करिअर मध्ये काही  अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या राशीनुसार सुद्धा अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सुचवले जातात. राशीनुसार कोणत्या देवाची उपासना करावी हे सुद्धा सांगितलं जातं. पण मुळात प्रश्न हा आहे की रास कोणती आहे? हेच माहित नसेल तर ह्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण चुकीची रास समजून चाललेले असतात .ras kashi olkhavi 2025सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तर चुकीच्या पद्धतीने मिळतात आणि मग ज्योतिष शास्त्राच्या उपायांचा परिणाम होत नाही. मग ज्योतिष शास्त्र खोटं आहे कुठलाच उपाय लाभत नाही. असं बोललं जातं सर्रास साहजिक आहे माणूस स्वतःच्या अनुभवातून आलेल्या गोष्टींनाच खरं मांडतो नाही का म्हणूनच आजचा हा विषय आहे रास कोणती आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमची रास तुमच्या चालू नावावरनं ठरत नाही हो अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे कारण की ,इतक्या वेळा हे विचारलं गेलंय की माझं चालू नाव  अमुक आहे तमुक आहे मग माझी रास काय ?

खात्रीशीर वेबसाईट साठी येथे click करा .

आणखी माहितीसाठी येथे click करा .

ras kashi olkhavi 2025 | चालू नावावरून रास बघायची का नाही?

तुम्हाला जे राशींच कोष्टक दिसतं ज्याच्यामध्ये अक्षर असतात वेगवेगळी आणि त्या अक्षरांवरनं रास सांगितलेली असते ,की च अक्षर असेल तर अमुक एक रास आहे. द अक्षर असेल तर अमुक एक रास आहे. हे जे कोष्टक आहे हे तुम्ही बघू नका कारण तुमच्या चालू नावावरनं तुमची रास ठरत नाही .तुमचं चालू नाव तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या आत्याने तुमच्या मामांनी आवडीने ठेवलेलं असतं ते काहीही असू शकतं ,राम शाम, शिवा, गोविंदा, कुठलंही नाव असू शकेल. त्या नावाचा आणि राशीचा काहीही संबंध नाही ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे.

ras kashi olkhavi 2025? जन्मपत्रिकेतून रास कशी शोधावी?

सगळ्यांना समजली असेल तर आपण पुढे जाऊया आता जर एखाद्याच  नाव तिच्या  आत्याने  ठेवलंय सविता. पाळण्यामध्ये सविता नावावरनं ती तिची रास बघू शकत नाही .आलं लक्षात जर एखादीच्या आजीने आवडीने नाव ठेवलंय वैदेही व अक्षर येतं मग व अक्षरावरनं कुठली रास असते बुवा तर ते बघूया हे चुकीचं आहे. तुमचं पाळण्यात जे काही नाव तुमच्या नातेवाईकांनी ठेवलं असेल ते नाव तुमचं हाका मारण्याचं जे नाव आहे ते नाव आणि त्या नावावरनं रास बघायची नाही .

ras kashi olkhavi 2025? रास शोधण्यासाठी आवश्यक माहिती

आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की चालू नावावरनं रास बघायची नाही हे खरं पण जर तुमचं नाव ठेवतानाच ज्योतिषांकडनं पत्रिकेनुसार अक्षर घेतलं होतं रास अक्षर घेतलं होतं आणि त्यानुसारच तुमचं नाव ठेवलेलं आहे, तर मग तुम्ही म्हणू शकता की तुमचं जे नाव आहे त्यावरनं तुम्ही रास बघू शकता मग काही हरकत नाही .कारण तुमचं रास नाव आहे तेच तुमचं चालू नाव आहे. त्यामुळे तुम्ही मग तुमची रास त्यावरनं बघू शकता आता समजा एखाद्या बाळाचा जन्म झाला त्याची जन्मपत्रिका तयार केली .ras kashi olkhavi 2025आणि जन्मपत्रिका तयार केल्यानंतर त्यामध्ये अक्षर निघाला आहे दी आता दी अक्षरावरूनच त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं दिपाली आणि हाका मारायला डॉक्युमेंट मध्ये सगळीकडे जर दिपाली हेच नाव ठेवलं गेलं तर मग त्याचं चालू नाव आणि रास नाव एकच झालं नाही का ?ras kshi olkhavi ?मग ती  म्हणू शकते  की, माझ्या नावावरनं माझी रास आहे मीन रास पण बहुतांश वेळा असंच बघितलं जातं की जे चालू नाव असतं ते आपले घरचे आपल्या आवडीनुसार ठेवतात किंवा कधी कधी नावकरी असतात त्यांच्या आजी-आजोबांच्या नावावर ठेवलेली नाव असतात किंवा बऱ्याचदा आई-वडिलांची दोन अक्षर मिळून नाव तयार केलेलं असतं .त्यामुळे जे चालू नाव आहे ते आवडीने ठेवलं गेल्यामुळे त्या नावाचा आणि राशीचा काही संबंध नाही आणि म्हणून चालू नावावर रास बघत नाही.

ras kashi olkhavi 2025जन्मपत्रिका नसल्यास काय करावे?

मग आता वळूया रास कशी बघायची या मुद्द्याकडे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास वाक्य अगदी सरळ साधं सोपं आहे परत सांगतो .आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास. पण आपल्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होता हे कसं कळणार त्यासाठी आपल्याला जन्मपत्रिका बघावी लागते जन्मपत्रिका तयार केली जाते. तीन गोष्टींनी एक म्हणजे तुमची जन्माची वेळ काय होती? जन्मतारीख आणि जन्म ठिकाण या तीन गोष्ठीवर  जन्मपत्रिका तयार करतात.

 ज्योतिषी किंवा हल्ली सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा उपलब्ध होते. आणि त्या जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला कळतं की चंद्र नक्की तुमच्या जन्माच्या वेळी कोणत्या राशीमध्ये होता ? किंवा बऱ्याचदा जन्मपत्रिकेमध्ये लिहूनही देतात की कुठली तुमची रास आहे. ते म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही तुमच्या चालू नावावरून रास बघू शकत नाही.ras kashi olkhavi 2025 तुम्हाला रास बघायची असेल तर तुमची जन्मपत्रिका उघडावी लागेल. आणि जर तुमच्यापैकी कुणाची जन्मपत्रिकाच बनवलेली नसेल तर काय करायचं ?  साधा सोपा उपाय आहे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला माहिती हव्यात त्या म्हणजे तुमची जन्म वेळ काय आहे? त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण काय आहे ?आणि जन्मतारीख ?या तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मोबाईलमध्ये कुंडलीचे किंवा जन्मपत्रिका तयार करणारे अनेक ॲप आहेत सॉफ्टवेअर आहेत ते ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता. आणि त्या ॲपमध्ये या तीन गोष्टी टाकल्यात ना की तुम्हाला संपूर्ण जन्मपत्रिका तयार मिळते मग तुम्ही कुठल्याही ज्योतिष तज्ञांकडे नाही गेलात तरी कमीत कमी तुमची रास तरी तुम्ही त्या ॲपमध्ये नक्कीच बघू शकता. 

ras kashi olkhavi 2025राशीनुसार ज्योतिषीय फायदे

तुम्हाला तुमच्या विषयी आणखीन व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तुमच्या जन्मपत्रिकेबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा आणखीन तुम्हाला काही उपाय हवे असतील, तर तुम्ही तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे. आता दोन गोष्टी आत्तापर्यंत आपण समजून घेतल्या एक म्हणजे चालू नावावरनं रास बघितली जात नाही .रास नाव वेगळं असतं ठीक आहे. जे अक्षर आपल्या जन्मपत्रिकेमधून येतं त्या अक्षरावरनं जे नाव ठेवलं जातं त्याला म्हणतात रास नाव. ras kashi olkhavi 2025तुम्ही तुमच्या बाळाचं हे नाव ठेवू शकता ते नाव चालू नाव म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. काही हरकत नाही कधी- कधी काय होतं, जे अक्षर निघतात ते जरा वेगळे निघतात. विचित्र निघतात की जसं च असेल किंवा ळ असेल आता या अक्षरांवरन काही नाव तयार होत नाहीत म्हणून मग चालू नाव वेगळं ठेवलं जातं पण जर तुमच्या घरात बाळाचा जन्म होणार आहे किंवा जन्म झालेला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं याचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा त्याची पत्रिका बनवाल तेव्हा जे अक्षर येईल त्या अक्षरावरनं नाव ठेवू शकता काहीही हरकत नाही तेच त्याचं चालू नाव म्हणूनही तुम्ही वापरू शकता .

ras kashi olkhavi 2025जन्मवेळी चंद्राची स्थिती पाहणे

पण मंडळी आशा आहे की तुम्हाला तुमची रास कशी काढायची हे कळलं असेल तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीमध्ये होता ,हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तीच तुमची रास आहे आणि तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या   राशीत होता हे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेत कळेल आणि जन्मपत्रिका कशी काढायची जन्मपत्रिका काढण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक जन्मवेळ ,जन्म ठिकाण आणि जन्मतारीख या तिन्ही गोष्टी तुम्ही मोबाईलच्या त्या कुंडली ॲपमध्ये किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये टाका तुमची जन्मपत्रिका तयार होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमची रास सुद्धा कळेल चालू नावावरून रास बघायची नाही हे क्लिअर झालं. चालू नावावर जी रास असेल त्या राशीवरनं राशी भविष्य बघायला जाऊ नका .ते कधीच खरं येणार नाही .

ras kashi olkhavi 2025जन्मठिकाण किवा जन्म तारीख

आता एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न अनेकांना त्यांची जन्मवेळ माहित नसते किंवा नीट जन्मतारीख माहित नसते किंवा जन्म ठिकाणाचा घोळ असतो मग अशा वेळी जन्मपत्रिका कशी बनवणार बरोबर मग तुम्ही तज्ञ ज्योतिषांकडे जा तज्ञ ज्योतिषांकडे गेल्यानंतर ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत अंकशास्त्र आहे किंवा पालमेस्ट्री आहे म्हणजेच हस्तरेषा शास्त्र आहे किंवा इतरही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला जर तुमच्या समस्येवर उपाय हवे असतील तर तज्ञ ज्योतिषी म्हणा किंवा तज्ञ अंकशास्त्रज्ञ असतील किंवा तज्ञ हस्तरेषा शास्त्रज्ञ असतील . हे तुम्हाला सल्ले देतात मार्गदर्शन करतात ras kashi olkhavi 2025मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबरया संदर्भात तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण blog ला follow करा . क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन blog नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील .

निष्कर्ष

या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा

Leave a Comment