Sampurn share market shika fakt 10 min -शेअर मार्केट म्हणजे काय? ट्रेडिंगचे प्रकार, इन्व्हेस्टमेंटचे फायदे, इक्विटी-करन्सी-कमोडिटी मार्केट, टेक्निकल व फंडामेंटल अनालिसिस यांची सविस्तर माहिती मराठीत.
प्रस्तावना
मित्रांनो, शेअर मार्केट हा विषय ऐकल्यावर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण खरं पाहता शेअर मार्केट हे पैसे वाढवण्याचं एक प्रभावी साधन आहे. योग्य ज्ञान, योग्य रणनीती आणि शिस्त असेल तर शेअर मार्केटमधून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येते
या लेखात आपण शेअर मार्केटचे प्रकार, ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंटचे फरक, टेक्निकल व फंडामेंटल अनालिसिस, तसेच मार्केटचे वेगवेगळे सेगमेंट्स यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
Sampurn share market shika fakt 10 min –शेअर मार्केटमध्ये दोन महत्त्वाचे मार्ग
शेअर मार्केटमध्ये दोन महत्त्वाचे मार्ग
शेअर मार्केटमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे लोक येतात –
- ट्रेडर (Trader) – अल्प कालावधीसाठी खरेदी-विक्री करणारे.
- इन्व्हेस्टर (Investor) – दीर्घकालीन गुंतवणूक करणारे.काही लोक दोन्ही भूमिका पार पाडतात, पण बहुतेक तज्ञांच्या मते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट हीच सर्वोत्तम आहे.
Sampurn share market shika fakt 10 min –ट्रेडिंगचे प्रकार
ट्रेडिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. प्रत्येकाचा कालावधी आणि नफा कमावण्याची पद्धत वेगळी असते.
1. स्कॅल्पिंग (Scalping)
काही सेकंद ते काही मिनिटांसाठीच ट्रेड घेणे.
मार्केट ओपन होताच झटपट खरेदी-विक्री करून छोटा नफा मिळवणे.
2. इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)
त्याच दिवशी खरेदी-विक्री पूर्ण करणे.
सकाळी घेतलेला शेअर दुपारी/संध्याकाळी विकून टाकणे.
3. स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)
२ ते ७ दिवसांत किंवा आठवड्याभरात पोझिशन बंद करणे.
५% ते १०% नफा मिळवण्याचा प्रयत्न.
4. पोझिशनल ट्रेडिंग (Positional Trading)
काही महिने ते एक वर्ष शेअर होल्ड करणे.
१०% ते २०% पर्यंत नफा मिळवण्याचा उद्देश.
अधिकृत माहितीसाठी येथे click करा .
इतर माहितीसाठी येथे click करा .
Sampurn share market shika fakt 10 min –इन्व्हेस्टमेंट म्हणजे खरी संपत्ती
इन्व्हेस्टमेंट म्हणजे पूर्ण पैशाने शेअर्स खरेदी करून मालकी हक्क मिळवणे.
डिलिव्हरी शेअर्स आपल्या नावावर येतात.
त्या शेअर्सवर कर्ज (Loan) सुद्धा घेता येते.
हाच आपला सातबारा मानला जातो.
याउलट, ट्रेडिंग ही फक्त इसार पावती – तात्पुरती खरेदी-विक्री.
–तज्ञ सांगतात
“100 – वय = इक्विटी टक्केवारी”
उदा. जर वय 40 असेल तर संपत्तीतील 60% हिस्सा शेअर मार्केट इक्विटीमध्ये हवा.
Sampurn share market shika fakt 10 min –भारतीय शेअर मार्केटचे तीन प्रमुख सेगमेंट
1. इक्विटी मार्केट (Equity Market)
शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे ठिकाण.
प्रमुख एक्स्चेंज: NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज), BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)
प्रकार: कॅश ,मार्केट ,फ्युचरऑप्शन (Derivative Market)
2. कमोडिटी मार्केट (Commodity Market)
सोनं, चांदी, क्रूड ऑईल, कॉपर, तसेच कृषी उत्पादने जसे सोयाबीन, हळद, ज्वारी यामध्ये ट्रेडिंग.
एक्स्चेंज: MCX (Multi Commodity Exchange) – मुख्यतः मेटल्स व एनर्जी.
NCDEX (National Commodity & Derivatives Exchange) – कृषी कमोडिटीज.
3. करन्सी मार्केट (Currency Market)
डॉलर, युरो, पौंड, येन यामध्ये ट्रेडिंग.
एक्स्चेंज: NSE, BSE आणि MCX-SX.
Sampurn share market shika fakt 10 min –टेक्निकल व फंडामेंटल अनालिसिस
1. टेक्निकल अनालिसिस (Technical Analysis)
चार्ट, कॅन्डल्स, इंडिकेटर्स, सपोर्ट-रेझिस्टन्स.
शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी महत्त्वाचे.
2. फंडामेंटल अनालिसिस (Fundamental Analysis)
कंपनीची बॅलन्स शीट, नफा-तोटा, पीई रेशो, प्रमोटर होल्डिंग.
लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी अत्यावश्यक.
का करावी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट?
- मालकी हक्क आपल्याकडे राहतो.
- शेअर्सवर कर्ज घेता येते.
- दीर्घकाळात कंपाउंडिंगचा फायदा होतो.
- जगातील सर्व श्रीमंतांच्या संपत्तीत 90% पेक्षा जास्त हिस्सा इक्विटीमध्ये आहे.
निष्कर्ष
शेअर मार्केट म्हणजे फक्त जुगार नाही तर शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मार्ग आहे.
अल्पकालीन नफ्यासाठी ट्रेडिंग करता येईल.
पण खरी संपत्ती आणि स्थैर्य इन्व्हेस्टमेंटमधूनच मिळते.
योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य रणनीतीने प्रत्येक मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो.